काँग्रेस  Pudhari Photo
गोवा

Goa Congress Voter | मतदार यादीतून वगळलेल्यांसाठी काँग्रेसची हेल्पलाईन

Goa Congress Voter | नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर कथितरीत्या वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांना मदत करण्याच्या उद्देशाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर कथितरीत्या वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांना मदत करण्याच्या उद्देशाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, प्रवक्ते अॅड. अमित पालेकर आणि सावियो कुतिन्हो उपस्थित होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्याची शंका असलेल्या किंवा प्रत्यक्षात नाव वगळलेल्या पात्र मतदारांना मार्गदर्शन व आवश्यक मदत या हेल्पलाईनद्वारे दिली जाणार असून त्याचा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे, अशी माहिती फेरेरा यांनी दिली.

गोव्यातील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेचा गैरवापर करून भाजपविरोधी मतदारांना लक्ष्य करण्यात आले. त्यांनी नावेली मतदारसंघातील भाजपच्या बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) यांनी तयार करून सादर केलेल्या मतदार वगळण्याच्या याद्या पत्रकार परिषदेत सादर केल्या.

या याद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अॅड. कार्लोस आल्वारेस फरेरा यांनी केला. सावियो कुतिन्हो यांनी हा प्रकार उघड केल्यानंतर संबंधित बीएलएपैकी एकाने तातडीने आपला अर्ज मागे घेतल्याचे पत्र सादर केले.

यावरून हा प्रकार केवळ एखाद्या एकाच मतदारसंघापुरता मर्यादित नसून राज्यभरातील विविध मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीने काम झाले असल्याचे दिसून येते," असे अॅड. कार्लोस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काही मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्याचे दिलेले आदेशही सादर केले.

मात्र, असे आदेश असतानाही संबंधित मतदारांना पुन्हा फॉर्म-६ भरून अर्ज करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही प्रक्रिया निवडणूक नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत, अशा आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT