Bhausaheb Wakchaure Defection: भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेने शिर्डीत खळबळ; शिवसैनिक आक्रमक

‘शिर्डीत पाय ठेवू देणार नाही’चा इशारा; संगमनेरमध्ये प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, राजकीय वातावरण तापले
Bhausaheb Wakchaure Defection
Bhausaheb Wakchaure DefectionPudhari
Published on
Updated on

शिर्डी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी बुधवारी (दि. १७) वाकचौरे यांच्या शिर्डी येथील निवासस्थानी धाव घेतली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तेथून माघार घेतली असली, तरी वाकचौरे यांच्याविरोधातील संताप कायम असल्याचे दिसून आले. कोणत्याही परिस्थितीत खासदार वाकचौरे यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार भाऊसाहेब वाकचौरे आता दुसऱ्यांदा शिवसैनिकांसमवेत विश्वासघात करत असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वाकचौरे आता 'ऑपरेशन टायगर'अंतर्गत सहा खासदारांसह शिंदे गटात जाणार असल्याची माहिती शिर्डीतील शिवसैनिकांना मिळाल्यानंतर बुधवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेतली.

Bhausaheb Wakchaure Defection
Maharashtra Rural Wild Fruits Disappearing: रानमेवा आणि ग्रामीण खेळ हरवत चालले; मोबाईलमुळे बदलते बालपण

जिल्हाप्रमुख सचिन कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ बावके, सोमनाथ गोरे, बंडू जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी वाकचौरे यांचा निषेध करत, त्यांनी विश्वासघात केलाच, तर त्यांना शिर्डीत येऊ देणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. काहींनी घराबाहेर कसा पडतो ते पाहू, असा इशारा दिला. यापूर्वीदेखील वाकचौरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळीही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या. नंतर पुन्हा ते मातोश्रीच्या दरवाजात आले. चुकांची माफी मागितली. त्या वेळीही आम्ही त्यांना 2024मध्ये उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यांनी साईबाबांची शपथ घेऊन गद्दारी करणार नसल्याचे सांगितल्याने उमेदवारी देण्यात आली. शिवसैनिकांनी रात्रंदिवस मेहनत घेत त्यांना विजयी केले. आता ते पक्षांतर करत असल्याची चर्चा असल्याने मनाला वेदना होत आहेत. मात्र, शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

Bhausaheb Wakchaure Defection
Ahilyanagar Illegal Liquor Transport: नेप्ती शिवारात गावठी दारू वाहतूक उघड; ओमिनी जप्त, एकास अटक

दरम्यान, गुरुवारी (दि. १८) श्रीरामपूर आणि कोपरगाव येथेही शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. यावेळी ‘पुढारी’शी बोलताना जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘वाकचौरे गद्दार आहेत. रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांना निवडून आणले. आज त्यांनी फक्त ‘मातोश्री’चाच नाही, तर सर्व शिवसैनिकांचा आणि मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही. यापुढे राजकारणात कोणीही फुटणार नाही, असा धडा शिर्डीतून आम्ही देशाला देणार आहोत,’ असे ते म्हणाले. वाकचौरे फुटणार हे संकेत सहा महिन्यांपूर्वीच मिळाले होते, ही 50 खोक्यांची मोठी डील होती, यातील 15 खोके सहा महिन्यांपूर्वीच त्यांना मिळाल्याचा दावाही कोते यांनी केला.

Bhausaheb Wakchaure Defection
Pravara River Illegal Sand Mining: प्रवरा नदीत अवैध वाळूउपसा; पोलिसांची धडक कारवाई, 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संगमनेर बसस्थानक परिसरात बुधवारी सायंकाळी खा. वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. खा. वाकचौेरे बुधवारी अधिकृतपणे शिंदे गटात सामील होत असल्याचे समजताच शहरासह तालुक्यात शिवसैनिकांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला. बसस्थानकावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि१७) प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार वाकचौरे यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात शहरप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख फैसल सय्यद, व्यापारी आघाडी शहरप्रमुख संभव लोढा, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, वाहतूक सेना पदाधिकारी अशोक बढे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, अरुण भालेराव, रवी गिरी, बाळासाहेब घोडके, आसिफ तांबोळी, दीपक साळुंखे, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ सातपुते, आश्वी मंडल प्रमुख, प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे,गणेश धात्रक, राजश्रीताई राहणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजूरे उपशहर प्रमुख कैलास गायके आदी उपस्थित होते.

Bhausaheb Wakchaure Defection
Rahuri Illegal Soil Transport: मुळा धरण परिसरात अवैध माती वाहतूक; ग्रामस्थांनी पकडला डंपर

ठाकरे देव माणूस, पण..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत; परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला, अशी पोस्ट खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सोशल मीडीयावर टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल, तर लोकप्रतिनिधी राहण्यात अर्थ उरत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी यापुढे काम करणार आहे. प्रसारमाध्यमातून माझी बदनामी केली जात आहे. माझे काही सहकारी रोष व्यक्त करत आहे. परंतु लोकसभा मतदारसंघातील जनमत व शिवसैनिक माझ्या या निर्णयाशी सहमत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी व निवडून दिलेल्या जनतेप्रति स्वच्छ हेतूने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला मान्य आहे. या निर्णयाचे मतदार बांधव व शिवसैनिक स्वागत करत आहे. लवकरच शिर्डीतील ताकद सिद्ध करू...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news