पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला आमदार देविया राणे, दामू नाईक व अन्य मान्यवर.  pudhari photo
गोवा

Goa News |'काँग्रेस राष्ट्रविरोधी, विश्वासघातकी पक्ष'

महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सडकून टीका

पुढारी वृत्तसेवा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलाकेंद्रित अनेक निर्णय घेतले

  • केंद्राच्या विविध योजना तसेच निर्णयांना विरोध करण्याचे काम काँग्रेसकडून

पणजी : देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी संसदेत मांडण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम २०२६ या विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निषेध केला. काँग्रेस हा राष्ट्रविरोधी व महिलाविरोधी पक्ष आहे. या विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांवर अन्याय तसेच त्यांचा विश्वासघात केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. ते म्हणाले, गेली ५० वर्षे काँग्रेसने केंद्रात राज्य केले. मात्र, महिलांना आरक्षण देण्यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. केंद्राच्या विविध योजना तसेच निर्णयांना विरोध करण्याचे काम काँग्रेस करत आली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलाकेंद्रित अनेक निर्णय घेतले आहेत. देशात ५० टक्के महिला आहेत. त्यांनाही समान हक्क आहे. त्यामुळे महिला आरक्षण त्यांना मिळायला हवे. देशातील महिलांचा सन्मान व प्रोत्साहन देण्याचे तसेच महिलांसाठी विविध योजना लागू करण्याचे काम केले आहे. मात्र, इंडिया अलायन्सने या विधेयकाला विरोध करून महिलांना धोका दिला आहे, असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळात महिलांना स्थान देणार...

गोव्यात महिलांना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न या सरकारचा असेल. भविष्यात महिलांना मंत्रिमंडळात नक्कीच स्थान दिले जाईल. माझ्या गेल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात एक महिला मंत्री होती. हे महिला आरक्षण लागू करण्यासाठी भविष्यात डबल इंजिन सरकार पुरेपूर प्रयत्न करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT