Miss India World Sadhvi Satish Sail |गोव्याची साध्वी सैल ठरली 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड'

गोव्याची साध्वी सैल ठरली 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड'
 Sadhvi Satish Sail
Miss India World Sadhvi Satish Sailpudhari photo
Published on
Updated on

पणजी : भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ६१व्या 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड' स्पर्धेच्या मुकुटावर गोव्याची प्रतिभावान कन्या साध्वी सतीश सैल हिने नाव कोरले. महाराष्ट्राची राजनंदिनी पवार ही उपविजेती ठरली. भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी मध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात साध्वीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६ चा मुकुट प्रदान करण्यात आला. ती जागतिक स्तरावर होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

गोव्यातील मॉडेल आणि उद्योजिका असलेल्या साध्वीने कष्ट, आत्मविश्वास आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा बहुमान प्रदान करण्यात आला. भुवनेश्वर साध्वी सैल हिला 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड'चा मुकुट मिळवला आहे. फॅशन क्षेत्रात सक्रिय असलेल्या साध्वीने अनेक नामांकित फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले आहे.

सुंदर प्रवासाची अनुभूती !

'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड' किताब जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना साध्वी म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अविश्वसनीय आहे. ही संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. स्पर्धेदरम्यान सर्व स्पर्धकांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण होते, माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धक विजेता आहे. हा सुंदर प्रवास अनुभवण्याची मला संधी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news