पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात वर्षभर पर्यटकांची रेलचेल सुरूच असली तरी प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक आवर्जून गोव्यात दाखल होत असतात. २५ डिसेंबर येशू जन्मोत्सवानिमित्त राज्यभरात धामधूम अनुभवास आली.
मध्यरात्री मिडनाईट मास ने सुरू झालेल्या नाताळची दिवसभर धामधूम होती. सर्वत्र नाताळाचे देखावे उभारण्यात आले आहे. ठिकठिकाणी सांताक्लॉजच्या प्रतिकृती देखील उभ्या केल्या आहेत. सर्व ख्रिस्ती बांधव नातलगांना भेटून कुसवार भेट देऊन नाताळच्या शुभेच्छा देत होते. रात्रीपासून अनेक ठिकाणी घरगुती पार्टी, क्लब पार्टी सुरू आहेत.
किनाऱ्यांच्या मानाने राजधानीत पर्यटकांची तुरळक गर्दी दिसून आहे. पर्यटकांनी किनारे फुलले! नाताळच्या सणात सहभागी होण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक गोव्यात आले असून किनाऱ्यांवर सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. उत्तर गोव्यातील पर्यटकांच्या आवडत्या कळंगुट समुद्रकिनाऱ्यांवर अनेकजण आपल्या कुटुंबियांसोबत मजामस्ती करण्यात मग्न आहेत.