पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
गोव्याचा घटक राज्य दिन ३० मे रोजी साजरा होत आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन है पणजी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. इतर राज्यांच्या तुलनेने गोव्याचा सर्वांगीण विकास झाला आहे. गोवा आकाराने लहान राज्य असल्यामुळे व केंद्रात आणि राज्यातही भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे हा विकास शक्य झालेला आहे.
गोवा है आंतरराष्ट्रिय पर्यटन राज्य असल्यामुळे जगभरातील देशी विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. वर्षाकाठी सुमारे ७० ते ८० लाख पर्यटक गोव्यात येतात. वा सर्वांच्या सोयीसाठी हव्या असलेल्या पायाभूत सुविधा राज्यभरात उभारल्या गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण व नव्या रस्त्यांचे जाळे उभे राहिले आहे. पोळे ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, आवश्यक तिथे नवे पूल, उडाणपूल उभे राहीले आहेत. मांडवी नदीवरील अटल सेतू च झुआरी नदीवरील नवा पूल आकर्षणाचे केंद्रे ठरली आहेत.
रस्ते व उड्डाणपुलांच्या उभारणीमुळे वाहतुकीत सुलभता आलेली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्यात येणाऱ्या विमानांची संख्या वाढली आहे. पर्वरी येथे सुरू असलेल्या ४५० कोटी खर्चाच्या उड्डाणपुलामुळे पणजी ते म्हापसा रस्त्याला वेगळे रूप प्राप्त होणार आहे. गोव्यात वाहतुकीच्या सोयीमुळे वाहतुकीत सुलभता आली असून लोकांच्या वेळेबरोबर इंधनाची बचत होत आहे.
गोव्यात पर्यटन हाच सध्याचा मुख्य उद्योग असल्यामुळे पर्यटकांचा हवे असलेल्या अनेक सुविधा सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. किनारी भागात स्वच्छता सोबतच शौचालय, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. केवळ किनारी भागातच नव्हे, तर अंतर्गत भागात असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना तेथे नेले जात आहे.
त्यामुळे किनारी भागांसोबतच अंतर्गत मागातील अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. पणजी शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास झाला आहे. पणजी परिसरात किनारी वॉक वे, योग सेतू, ज्ञान सेतू सारख्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत, राज्यातील पंचायती व पालिकांच्या विकासासाठी विशेषतः कचरा नियंत्रण, विकास प्रकल्प यासाठी राज्य व केंद्र सरकार भरीव निधी पंचायती व पालिकांना देत असल्याने राज्याचे स्वरूप पालटत आहे.
मच्छीमार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा यांच्यासाठी विविध योजना सरकार राबवत असून युवकांसाठी कौशल्य शिक्षण देऊन कौशल्याद्वारे त्यांनी उद्योजक व्हावे, स्वयंरोजगार उभारावेत, नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजीपाल्यात गोवा स्वयंपूर्ण स्वर्वपूर्ण गोवा
करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. राज्यात भाजी उत्पादन वाढून ती निर्यात केली जात आहे. महिलांनी विविध व्यावसाय सुरू केले आहेत. युवक स्वयंरोजगार उभारत आहेत. त्यामुळे २०३७ पर्यंत स्वयंपूर्ण गोवा करण्याचे आणि पंतप्रथान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी गोवा राज्य योग्य दिशेने स्वयंपूर्ण होताना दिसत आहे.
गोवा बनणार एज्युकेशन हब
गोव्याला एज्युकेशन हब करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केले आहेत. खासगी शिक्षण संस्थांना परवानगी देतानाच राज्य सरकारने विविध महाविद्यालये सुरू करून युवांना विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध केल्या आहेत.