casinos Pudhari File Photo
गोवा

Goa Casino Businessman Shooting| कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून, संशयितांच्या जबाबांमधून क्राईम ब्रँचचा निष्कर्ष

Goa Casino Businessman Shooting| कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून, संशयितांच्या जबाबांमधून क्राईम ब्रँचचा निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी येथील जिओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार हल्ला कॅसिनो व्यवसाय पूर्ववैमनस्यातून झाल्याचा निष्कर्ष आतापर्यंत केलेल्या चौकशीतून पोलिसांना दिसून आला आहे. बोरवलीस्थित (मुंबई) संशयित सतीश शिंदे हा कॅसिनो व्यवसायाशी संबंधित असून, हल्ल्यामागे मुख्य सूत्रधारापर्यंत जाण्याचा प्रयत्न क्राईम ब्रँच पोलिस करत आहेत.

श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार करणारे दोघे शूटर्स अपुंथराज ऊर्फ अण्णा नडार व बाबू अली याचे लागेबांधे गुन्हेगारीशी आहेत. त्यातून त्यांना गोळीबार करण्याची सुपारी कोणी दिली याचा तपास करत आहेत. या दोघांनी हल्ल्यासाठी वापरलेली गावठी पिस्तुले ही सुद्धा जप्त करण्यासाठी त्यांच्याकडून माहिती वदवून घेण्यात येत आहे. नायक यांचा अंगरक्षक व दोघा शूटर्सनी काही मीटरच्या अंतरावरून एकमेकांवर गोळीबार पिस्तुलने केला.

मात्र, या गोळ्या देह सोडून इतर बाजूला झाडल्या. त्यामुळे त्यामागीलही कारण पोलिस शोधून काढत आहेत. अर्जुराज ऊर्फ अण्णा नाडर याने पोलिसांची तपासात दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर गोवा पोलिस कार्यपद्धतीवर व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

गोळीबार घटनेवेळी हल्लेखोर ज्या वाहनांमधून पसार झाले. त्या वाहनांचा क्रमांक बनावट होता. त्यामुळे वाहने जप्त करण्यात अडचणी येत आहेत. या हल्ला कॅसिनो व्यवसाय पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे चौकशीतून दिसून येत असल्याने निओ मॅजेस्टिक कॅसिनो संचालकांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

'तो' व्हिडीओ दिशाभूल करण्यासाठीच

गोळीबारप्रकरणी क्राईम ब्रँचने अटक केलेले सर्व सातही संशयित पोलिस कोठडीत आहेत. शूटर्स अर्पथराज ऊर्फ अण्णा नडार व बाबू अली या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. मुंबईतही अण्णा याच्यावर लहानसहान गुन्हे नोंद आहेत. व्हारल झालेल्या व्हिडीओमध्ये अर्पथराज ऊर्फ अण्णा याने दिलेली माहिती खोटी आहे. त्याने तो व्हिडीओ पोलिसांना गुंगारा देण्यासाठी, तसेच तपासाची दिशा बदलण्यासाठी केल्याची कबुली अण्णा याने पोलिसांना दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT