Goa CM Pramod Sawant (Pudhari File Photo)
गोवा

Tuye hospital recruitment | तुये येथील नव्या इस्पितळासाठी 97 कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती

Tuye hospital recruitment | मंत्रिमंडळाची मान्यता; बंदर खात्याला मिळणार नवा उप कप्तान

पुढारी वृत्तसेवा

  1. बंदर कप्तान खात्यात उपकप्तान हे नवे पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.

  2. तुये येथील नव्या इस्पितळासाठी ९७ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर भरती होणार.

  3. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पीजी जागांसाठी रोस्टर पद्धतीने आरक्षण लागू.

  4. आरोग्य खात्याच्या नव्या प्रकल्पासाठी तिस्क–फोंडा येथील जागा पुन्हा आरोग्य विभागाकडे.

  5. आरोग्य खात्यात मोठ्या पदांची लवकरच गोवा पब्लिक कमिशनमार्फत भरती.

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बंदर कप्तान खात्याला आता उपकप्तान मिळणार असून, तुये येथील नव्या इस्पितळासाठी ९७ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर भरले जाणार आहेत. बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वरील निर्णयासह इतर निर्णय घेण्यात आले. बंदर कप्तान खात्यात उप कप्तान हे नवे पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पीजीच्या जागा अनुसूचित जमाती (एसटी), अनुसूचित जाती (एससी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व आर्थिक कमजोर (ईडब्ल्यूएस) यांच्यासाठी राखीव ठेवण्यासाठी यापुढे रोस्टर पद्धत वापरली जाणार आहे. राखीव जागा कमी होणार नाहीत. मात्र, त्या रोस्टर पध्दतीने राखीव केल्या जातील.

या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ते म्हणाले, कुडणे येथील रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला जागा प्रदान करणे, त्याचबरोबर तिस्क फोंडा येथील पूर्वीची आरोग्य खात्याची जागा जी कला व संस्कृती खात्याला देण्यात आली होती ती पुन्हा आरोग्य खात्याला देण्यात येणार आहे.

सदर जागी आरोग्य खात्याचा नवा प्रकल्प येणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जनरल सर्जनची दोन पदे, त्याचबरोबर लेक्चरर, ट्यूटर आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामध्ये मायक्रोबायोलॉजी साठी दोन आणि एनेस्थेसियसची ९ पदे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य खात्यात लवकरच भरती...

राष्ट्रीय नियमावलीनुसार येत्या काळामध्ये गोवा पब्लिक कमिशनद्वारे आरोग्य खात्यातील मोठ्या पदांची भरती केली जाणार असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT