Goa Board 10th result  file photo
गोवा

Goa Board 10th result | दहावी परीक्षेचा निकाल उद्या

Goa Board 10th result | दहावी परीक्षेचा निकाल उद्या

पुढारी वृत्तसेवा

गोवा बोर्डाच्या दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विविध रिपोर्टनुसार SSC निकाल लवकरच, कदाचित उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी नियमित अपडेट तपासत राहावे.

Goa Board ssc result

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल रविवार, दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

यंदाची एसएससी परीक्षा १३ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत ३२ परीक्षा केंद्रांवर पार पडली. नियमित गटातून एकूण २०,६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यामध्ये १०,८१९ मुले आणि ९,८४० मुलींचा समावेश आहे. बोर्डाच्या माहितीनुसार, एकत्रित निकालपत्रक २८ एप्रिलपासून शाळांच्या लॉगिनद्वारे डाऊनलोड करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT