fraud case (File Photo)
गोवा

Goa Fraud Scam |सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एकाच कुटुंबातील तिघांची १.२७ कोटींची फसवणूक

Government Job Fraud Scam-बनावट नियुक्तीपत्र : मालमत्ता व्यवहार उघड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : बनावट सरकारी नियुक्तीपत्र, सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहाराच्या माध्यमातून तळेकर या एकाच कुटुंबातील तिघांची एकूण १ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पणजी पोलिसांनी अजित शंखवाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज तळेकर यांना गोव्याचे अबकारी आयुक्त म्हणून नियुक्त केल्याचे दर्शविणारे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून २७ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच मनोज तळेकर यांच्या बहिणीला शिक्षण खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन २२ लाख रुपये घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, मनोज तळेकर यांच्या वडिलांची मालमत्तेशी संबंधित स्वतंत्र व्यवहारात ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या तीन प्रकरणांतील कथित रकमेची एकूण बेरीज १ कोटी २७ लाख रुपये होते.

या प्रकरणामुळे बनावट सरकारी कागदपत्रांचा वापर करून, तसेच सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या प्रकारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

व्यवहारांची पडताळणी

पणजी पोलिसांनी या प्रकरणी संशयित अजित शंखवाळकर याचा शोध सुरू केला आहे. फसवणूक झालेल्यांशी त्याने केलेल्या व्यवहाराचीही पडताळणी सुरू केली आहे. त्याने मनोज तळेकर याला दिलेली सरकारी नोकरीचा आदेश कोठून तयार केला याची माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT