Land Pudhari
गोवा

Goa ED Raid | बनावट दस्तऐवज अन् आर्थिक गैरव्यवहार; गोव्यातील जमीन हडप प्रकरणी ED ॲक्शन मोडमध्ये

Goa ED Raid | सिद्दीकीच्या कारवार, तर शिवोलीत सौदागरच्या घरावर छापा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील जमीन हडप प्रकरणाच्या तपासाला आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वेग देताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या कारवार येथील मालमत्तेवर, तसेच आसिफ सौदागर याच्या माडेल-शिवोली येथील घरावर ईडीने छापे टाकले.

ईडीच्या पथकांनी संबंधित ठिकाणी छाप टाकून मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर संभाव्य पुराव्यांची तपासणी सुरू केली. जमीन व्यवहार, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती या कारवाईत तपासण्यात आली.
सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याचे नाव जमीन हडप प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. त्याच्याशी संबंधित मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची ईडीकडून तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे आसिफ सौदागर याच्या माडेल-शिवोली येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

दरम्यान, या छाप्यांमध्ये ईडीच्या हाती नेमके कोणते दस्तऐवज किंवा अन्य पुरावे लागले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर कारवाईचे स्वरूप आणि पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कारवाईला विशेष महत्व

दस्तऐवज जप्त करण्यात आले. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे, फसव्या पद्धतीने मालमत्ता हस्तांतरण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित संशयितांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ईडीच्या कारवाईला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT