मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दवर्ली येथील तळ्याचे नगर नियोजन खात्याच्या कलम ३९-अ अंतर्गत रूपांतरण करण्याच्या प्रस्तावामुळे गावात पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या तळ्याच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत ग्रामस्थांनी तळ्याचे रूपांतरण न करता त्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याची ठाम मागणी केली आहे. दवर्ली येथील या तळ्याच्या रूपांतरणावरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तळ्याच्या संवर्धनासाठी ग्रामस्थ एकत्र आले असून तळे वाचवण्यासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काही सामाजिक संस्थांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून तळे वाचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे तळे गावाच्या पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. भूजल पातळी राखणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्थानिक परिसंस्थेला आधार देणे यामध्ये या तळ्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या जलस्रोताच्या मूळ स्वरूपात बदल झाल्यास भविष्यात पाण्याच्या टंचाईसारखे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांचे प्रतिनिधी जॅक्सन वाझ यांनी सांगितले की, पूर्वी या तळ्याच्या पाण्याचा वापर गावातील नागरिक घरगुती कारणांसाठी करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पंचायतीकडून सांडपाणी वाहून नेणारे नाले तळ्याकडे सोडण्यात आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.
परिणामी, तळ्याची गुणवत्ता खालावली असून त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. तळे प्रदूषित होण्यामागील कारणे दूर करण्याऐवजी त्याचे रूपांतरण करण्याचा विचार अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने प्रथम तळ्याची स्वच्छता करून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या ग्रामसभांमध्ये तळ्याच्या रूपांतरणाला विरोध दर्शविणारे ठराव मंजूर करण्यात आल्याचे नमूद केले. ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर राखून प्रशासनाने पुढील भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने प्रस्ताव मागे घेतला नाही, तर ग्रामस्थ अधिक आक्रमक भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला. गरज पडल्यास तळ्याच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
तळ्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण...
दवर्ली तळे हे गावाच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भूजल पातळी टिकवून ठेवणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्थानिक परिसंस्थेला आधार देणे यामध्ये या तळ्याची भूमिका मोठी आहे. मात्र, सांडपाण्यामुळे वाढत्या प्रदूषणामुळे या तळ्याच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा जलस्रोतांचे संवर्धन केल्यास पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत होते. तळे गावाच्या पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्वाचे केंद्र आहे.
भूजल पातळी राखणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्थानिक परिसंस्थेला आधार देणे यामध्ये या तळ्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या जलस्रोताच्या मूळ स्वरूपात बदल झाल्यास भविष्यात पाण्याच्या टंचाईसारखे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांचे प्रतिनिधी जॅक्सन वाझ यांनी सांगितले की, पूर्वी या तळ्याच्या पाण्याचा वापर गावातील नागरिक घरगुती कारणांसाठी करत होते.
मात्र, गेल्या काही वर्षांत पंचायतीकडून सांडपाणी वाहून नेणारे नाले तळ्याकडे सोडण्यात आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. परिणामी, तळ्याची गुणवत्ता खालावली असून त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. तळे प्रदूषित होण्यामागील कारणे दूर करण्याऐवजी त्याचे रूपांतरण करण्याचा विचार अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने प्रथम तळ्याची स्वच्छता करून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या