Arrested Pudhari
गोवा

Goa News | 'पुढारी'चा दणका! निर्भीड पत्रकारितेमुळेच कुडचडे सेक्स स्कँडलमधील नराधम जेरबंद

Goa News | हे गंभीर प्रकरण उघडकीस आणताना दैनिक पुढारीने कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना न जुमानता सातत्याने पाठपुरावा केला,

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

हे गंभीर प्रकरण उघडकीस आणताना दैनिक पुढारीने कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना न जुमानता सातत्याने पाठपुरावा केला, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्य समोर आणण्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणाला वेग आला आणि पोलिस यंत्रणेलाही तत्काळ कारवाई करावी लागली.

माजी नगरसेवक फेलिक्स फर्नाडिस यांनी निर्भीड पत्रकारितेसाठी दैनिक पुढारी ओळखला जाती, पुढारीने हा विषय उचलला नसता, तर अनेक पीडितांना न्याय मिळालाच नसता. दैनिक पुढारीने समाजाप्रती आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आहे असे त्यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष आनंद प्रभुदेसाई म्हणाले की है वृत्तांकन केवळ बातमी नव्हे, तर समाजजागृतीचे कार्य आहे.

अशा प्रकारच्या धाडसी पत्रकारितेची आज समाजाला नितांत गरज आहे नगरसेविका अपर्णा प्रभुदेसाई यांनी प्रतिक्रिया देताना अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसाठी अशा घटना समोर येणे गरजेचे आहे, दैनिक पुढ़ारीने हवा. केलेले काम कौतुकास्पद असून यामुळे अनेकांना धाडस मिळेल असे त्या म्हणाल्या. माजी नगरसेवक पुष्कल सावंत म्हणाले की दैनिक पुढारीने कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडले.

हीच खरी पत्रकारिता आहे आणि समाजाने अशा माध्यमांना पाठिंबा द्यायला महिला संघटनेच्या अध्यक्षा अवदा व्हिएगस यांनी पुढारीचे कौतुक करताना पीडित मुलींना आवाज देण्याचे काम दैनिक पुढारीने केले. यामुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. दोषींना कठोर शिक्षा पहावी असे त्या म्हणाल्या.

समाज कार्यकर्ते दत्तराज राऊत देसाई यांनी ही घटना अत्यंत गंभीर असून दैनिक पुढारीच्या धाडसी वृत्तांकनामुळे सत्य बाहेर आले आणि प्रशासनाला कारवाई करावी लागली. हे समाजासाठी महत्वाचे आहे अशी चाजू मांडली. दरम्यान, या घटनेमुळे समाजमन हादरले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT