Sex Scandal Case  
गोवा

Sex Scandal Goa | कुडचडे सेक्स स्कँडलचा विळखा वाढला! पाचवी पीडिता समोर; सोहम नाईकच्या कृत्यांचा पाढा

Sex Scandal Goa | संशयित सोहम नाईकचा आणखी एक कारनामा उघड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे परिसरातील सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेल्यांची प्रकरणे एका पाठोपाठ समोर येऊ लागल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या संशयित सोहम नाईकच्या अडचणी दिवसेंदिवस वाढल्या आहेत. या प्रकरणात आणखी एका पीडित महिलेने तक्रार नोंद केली आहे.

मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील गुन्ह्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने सोहम नाईकला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

नव्या तक्रारीनुसार, संशयिताने मैत्रीचे आमिष दाखवत संबंधित महिलेशी जवळीक साधली आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गंभीर आरोपाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून अधिक पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संशयित सोहम नाईक याचा पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधून त्याने सर्व व्हिडीओ व डेटा काढून टाकलेला आहे. दै. 'पुढारी'ने हे उघड केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केला. त्याचा फायदा घेऊन त्याने पीडितांचे कथित आक्षेपार्ह अश्लिल व्हिडीओ तसेच छायाचित्रे मोबाईलमधून काढून टाकली.

पोलिसांवर दबाव असल्याने तक्रारदाराची वाट पाहत पोलिस बसले. या प्रकरणाची पोलिस स्वेच्छा दखल घेत चौकशीस सुरुवात करू शकले असते. मात्र, पोलिसांवर असलेल्या दबावामुळे ते सुद्धा हतबल झाले होते. अखेर कुडचडे बंदचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद संशयित सोहम नाईक याला गजाआड करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT