Curchorem MLA Nilesh Cabral  
गोवा

Curchorem MLA Nilesh Cabral | "आमदार निलेश काब्रालांमुळे मिळाले हक्काचे घर! स्वखर्चातून बांधून दिले घर

Curchorem MLA Nilesh Cabral | आमदार निलेश काब्रालांमुळे मिळाले हक्काचे घर; स्वखर्चातून बांधून दिले घर, कुडचडे-पंटेमळ येथील नाईक कुटुंबियाचे स्वप्न साकार

पुढारी वृत्तसेवा

सांगे : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येकालाच स्वतःचे सुरक्षित आणि चांगले घर असावे असे वाटत असते, मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशाच परिस्थितीत असलेल्या कुडचडेतील पंटेमळ येथील दोन भावांचे घराचे स्वप्न आमदार निलेश काब्राल यांच्या पुढाकाराने साकार झाले आहे.

पंटेमळ येथील प्रकाश गणेश नाईक आणि मंगेश गणेश नाईक हे दोघे भाऊ मोडकळीस आलेल्या मातीच्या घरात राहत होते. प्रकाश नाईक कुडचडे बाजारात मोटारसायकल पायलट म्हणून काम करत असून, मर्यादित उत्पन्नामुळे त्यांना नवीन घर बांधणे शक्य होत नव्हते.

ही बाब समाजसेवक रिकी होडारकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अमृत नाईक आणि वरुण कुडचडकर यांच्या सहकार्याने आमदार निलेश काब्राल यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.नाशिक

यानंतर आमदार काब्राल यांनी कोणताही विलंब न लावता स्वखर्चातून या दोन्ही भावांसाठी नवीन घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तीन महिन्यांत घराचे बांधकाम पूर्ण झाले आणि २४ जुलै रोजी गृहप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

आमदार निलेश काब्राल म्हणाले, "या कुटुंबाची परिस्थिती समजल्यानंतर त्यांना नवीन घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. कुडचडे मतदारसंघात अशा अनेक गरजू कुटुंबांना घर उभारणे शक्य होत नाही. अशा कुटुंबांना भविष्यातही माझे सहकार्य कायम राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT