गोवा

corona vaccine : गोव्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस मोफत मिळणार

अविनाश सुतार

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ६० वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस अर्थात बुस्टर डोस (corona vaccine )मोफत देण्यात येणार आहे. गोवा सरकारच्या आरोग्य खात्याच्या कोरोना नियंत्रण लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मेपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यातील खासगी इस्पितळातच बुस्टर डोस ३८० रुपये शुल्क भरून दिले जात होते. आता सरकारने राज्यातील ६० वर्षावरील नागरिकांना आरोग्य केंद्रात बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस  (corona vaccine ) घेतलेले आहेत. त्यांनाच सावधगिरीचा डोस म्हणून बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. ६० वर्षावरील नागरिकांना आठवड्यातील तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवारी सरकारी रुग्णालयात बुस्टर डोस देण्यात येणार आहेत. राज्यात १८ वर्षावरील ११२ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची दोन्ही डोस यापूर्वीच देण्यात आले आहेत. १२ वर्षावरील विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्याचा उपक्रम सुरू आहे.

corona vaccine : हर घर दस्तक कार्यक्रम

आरोग्य संचालनालयातर्फे हर घर हस्तक हा उपक्रम सुरू होणार आहे. डॉ. बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत आरोग्य अधिकारी प्रत्येक घरात फिरतील आणि ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांची ओळख करून घेतील. तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेत की नाही, याची विचारणा करतील. दोन्ही डोस घेतलेल्यांनी सावधगिरीचा (बुस्टर) डोस घ्यावा, अशी विनंती ते नागरिकांना करतील, अशी माहिती डॉ. बोरकर यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT