वास्कोः पुढारी वृत्तसेवा : जहाजावरून समुद्रात पडलेल्या पापाडोपॉलस डोनिसिस या ग्रीक नागरिकाला सागरी बचाव समन्वयक केंद्राने केलेल्या प्रयत्नामुळे दुसर्या मालवाहू जहाजाने शोध घेऊन सुखरूपपणे वाचविले. वैद्यकीय उपचारानंतर त्याची प्रकृती निरोगी व स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
'गॅलिनी' या मालवाहू जहाजावरील अधिकारी डोनिसिस हे रविवारी (दि. 27) सकाळी पाण्यात पडल्यासंबंधी मुंबईच्या सागरी बचाव समन्वयक केंद्राचा संदेश भारतीय तटरक्षक दलाला मिळाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच समुद्रातील संकटग्रस्त नाविकांना मदत देण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या आदेशाची पूर्तता करताना सागरी बचाव समन्वयक केंद्र तातडीने कामाला लागले.
'गॅलीनी' या जहाजापासून अतिशय जवळ असलेल्या 'बार्जन' या मालवाहू जहाजाला शोध व बचाव करण्यासाठी तेथे वळविण्यात आले. त्यानंतर 'बार्जन' जहाजावरील कर्मचार्यांनी डोनिसिस याला सुखरूपपणे आपल्या जहाजावर आणले.
हेही वाचलंत का?