CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | कर्करोग प्रतिबंधासाठी गोव्यात आता 'एआय'चा वापर; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुंबईत मोठी घोषणा

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : 'समाकलन २.०- एकात्मिक' वरील राष्ट्रीय परिषद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा, प्रतिबंधात्मक काळजी आणि नावीन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध आहे. गोवा सरकार एआयची मदत घेऊन कर्करोग प्रतिबंधासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबई येथे टाटा मेमोरियल सेंटर आणि मधील आघाडीच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत 'समाकलन २.०' एकात्मिक ऑन्कोलॉजीवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ही परिषद अधिक समग्र, रुग्ण-केंद्रित कर्करोग काळजीसाठी, उपचार, जीवनमान, मानसिक कल्याण, पुनर्वसन आणि सहायक काळजी समाविष्ट आहे.

पुराव्यावर आधारित आयुषला आधुनिक ऑन्कोलॉजीशी जोडण्याची गरज अधोरेखित करते. त्याचा गोवा राज्याला मोठा फायदा होणार आहे.

ते म्हणाले की, टाटा मेमोरियल सेंटरसोबतचे सहकार्य आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेसोबतचे संयुक्त क्लिनिक उपक्रम या संकल्पाचे प्रतिबिंबित करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT