Beed Crime News : आडस-आसरडोह परिसरात एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या

लाखोंचा ऐवज लंपास, पोलिस चौकीसमोरील सराफा दुकान फोडले
Beed Crime News : आडस-आसरडोह परिसरात एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या
Published on
Updated on

Theft occurred at seven different locations in the Ads-Asardoh area in a single night

धारूर पुढारी वृत्तसेवा : धारूर पोलीस ठाणे हद्दीतील आडस आणि आसरडोह परिसरात गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत मुख्य बाजारपेठेतील पाच दुकाने आणि आसरडोह येथील दोन घरे फोडून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्री सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Beed Crime News : आडस-आसरडोह परिसरात एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या
Beed District Hospital : कारभार सुधारण्यासाठी द्यावे लागणार इंजेक्शन

आडस येथील महाराणा प्रताप चौकात दोन मेडिकल दुकाने फोडून रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तसेच पवार मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद होऊ नयेत म्हणून डीव्हीआर काढून नेण्यात आला. यानंतर थेट आडस पोलीस चौकीसमोरील ओमकार ज्वेलर्स हे दुकान फोडून येथील मौल्यवान ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याच रात्री पतंगे मोटार रिवायडिंग दुकानातून तांब्याची तार चोरीस गेली असून साठे चौकातील मंगलदीप कपड्याचे दुकानही फोडण्यात आले आहे.

यानंतर चोरट्यांनी आडसपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील आसरडोह गावाकडे मोर्चा वळवून बालासाहेब पिंगळे आणि गोविंद लक्ष्मण झाडगर यांच्या घरांवर डल्ला मारला. या घरांमधून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज चोरीस गेला असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आडस चौकीचे तसेच धारूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Beed Crime News : आडस-आसरडोह परिसरात एकाच रात्री सात ठिकाणी चोऱ्या
Beed Accident News : कुटे दाम्पत्याला नेणाऱ्या पोलिस व्हॅनची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात आले असून तपासासाठी बीड येथून ठसे तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरच चोरून नेण्यात आल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.

सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमकी किती रक्कम व किती किमतीचा ऐवज चोरीस गेला याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा हात साफ केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news