Margao Hospicio Hospital 
गोवा

Hospicio District Hospital | हॉस्पिसिओच्या विस्तारासाठी केंद्राकडून 50 कोटी रुपयांचा निधी : विश्वजीत राणे

Hospicio District Hospital | केंद्र सरकारने हॉस्पिसिओ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील विशेष वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यासाठी गोवा सरकारला ५० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे,

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने हॉस्पिसिओ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील विशेष वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यासाठी गोवा सरकारला ५० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

केंद्रीय निधीचा वापर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आपत्कालीन इमारत बांधण्यासाठी केला जाईल, जिथे लवकरच एक अतिदक्षता विभाग (क्रिटिकल केअर युनिट) स्थापन केला जाईल. दक्षिण गोवा जिल्ह्यात कॅथ लॅब आणि विशेष न्यूरोलॉजी कार्यान्वित केले जाईल, असे राणे यांनी सांगितले.
आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या स्टेट केअर उपक्रमाच्या विस्ताराची घोषणा केली; ज्याचा उद्देश गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी थेट वैद्यकीय सुविधा पोहोचवणे आहे.

हॉस्पिसिओ रुग्णालयात डॉक्टरांसोबत बैठक आणि तपासाणीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, त्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी आके आणि लगच्या परिसरातील दहा घरांना भेट दिली. भेटीदरम्यान, मंत्र्यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकल्या आणि घरपोच हस्तक्षेपाद्वारे त्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

१५०० रुग्णांना घरपोच आरोग्य सेवा

या उपक्रमांतर्गत सध्या राज्यभरातील १,५०० लाभार्थ्यांना घरपोच आरोग्यसेवा पुरवली जात आहे. आरोग्य विभाग डिसेंबर २०२६ पर्यंत या सुविधेअंतर्गत ५० ग्रामपंचायती आणि वाळपई, म्हापसा, मडगाव या चार नगरपालिका दत्तक घेईल. आवश्यक मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाइल पाठवण्यात आली आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT