मुलीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकास अटक  Pudhari File Photo
गोवा

Professor Road Accident Death |काणकोण हादरले! लाडक्या प्राध्यापिकेचा अपघाती मृत्यू; विद्यार्थ्यांना नोट्स देण्यासाठी जात असताना काळाचा घाला

Professor Road Accident Death | विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका सुचिता बांदेकर यांची अकाली 'एक्झिट'

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा

घरात आई, तिच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठी असलेली आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बहीण तर एक भाऊ वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला जातो. या सर्वांची लाडकी तसेच विद्यार्थीप्रिय साहाय्यक प्राध्यापिका सुचिता सुनिल बांदेकर (वय २७) यांचा बुधवारी ८ रोजी सकाळी माशे येथे कारच्या धडकेत मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारने ठोकर दिल्याने सुचिता चालवित असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कारचे मालक आपल्या कुटुंबीयांना विमानतळावरून घेऊन कारवारला जात होते. माशे येथे पोहोचताच हा अपघात घडला.

कारमधील व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावाच्या जिल्हा इस्पीतळात पाठवला. सुचिता यांनी महाविद्यालयात जाताना बस वेळेत मिळत नसल्याने अलीकडेच दुचाकी घेतली होती. त्या गावच्या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हायच्या असे लोलये पोळे पंचायतीचे पंच सदस्य सचिन नाईक यांनी सांगितले.

श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाची विद्यार्थिनी व नंतर महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका म्हणून सेवा बजावणाऱ्या सुचिता या विद्यार्थी प्रिय होत्या. महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, त्यांना बुधवारी सुपरव्हिजन नव्हते तरीही त्या विद्यार्थ्यांना पुढील पेपरच्या नोटस् देण्यासाठी त्या महाविद्यालयाकडे जात होत्या.

कॉलेजमध्ये होत असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्या सूत्रसंचालन करायच्या. उत्कृष्ट नाट्य कलाकार असलेल्या सुचिता यांनी गेल्या आठवड्यात देळे येथे झालेल्या नाट्यप्रयोगात भाग घेतला होता. तोच तिचा नाटकातील अखेरचा अभिनय ठरला, असे श्री मल्लकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे वरिष्ठ कारकून रामदास सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT