बोरी कचरा वर्गीकरण केंद्राचे लोकार्पण करताना मान्यवर. (छायाचित्र राजेश बोस्कर) 
गोवा

Bori Garbage Management issue - बोरीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अखेर मार्गी

वर्गीकरण केंद्राचे लोकार्पण; ग्रामपंचायतीसह कोमुनिदादचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

बोरी : बोरी ग्रामपंचायत आणि बोरी कोमुनिदाद यांच्या संयुक्त सहकार्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामसभांमध्ये नागरिकांनी वारंवार मांडलेल्या मागणीनुसार अखेर बोरी बाययकोल येथील कोमुनिदादवी जमीन कचरा वर्गीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

बोरी कोमुनिदादचे विद्यमान अध्यक्ष होन बोरकर, कमाविसदार मनोज बोरकर, राजेंद्र प्रभू देसाई तसेच इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या दीर्घकालीन मागणीला मंजुरी देत ही जमीन दानस्वरूपात उपलब्ध करून दिली. त्यामुळे संपूर्ण बोरी गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

सरपंच सागर नाईक यांनी स्वागत करताना सांगितले की, सर्व पंचांच्या सहकार्यामुळे कचरा वर्गीकरण केंद्राचे स्वप्न साकार झाले. पंच जयेश नाईक आणि पंच पप्पू ऊर्फ दत्तेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला विशेष गती मिळाली. लवकरच पंचायततर्फे सर्व वाड्यांमध्ये दर आठवड्याला कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कमाविसदार मनोज बोरकर, कोमुनिदादचे अध्यक्ष हरेन बोरकर, सरपंच सागर नाईक, उपसरपंच भावना नाईक आणि पंच सुनील नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कचरा वर्गीकरण केंद्र आणि कचरा शेडचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंच किरण नाईक, स्वच्छता दूत संजय भट, कोमुनिदादचे राजेंद्र प्रभू देसाई तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पारपतीवाड्याचे पंच पप्पू ऊर्फ दतेश नाईक यांनी आभार मानले.

कोमुनिदादमुळे विकासकामांना गती

सरपंच सागर नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून पंचायत इमारतीजवळ कचरा एकत्र करून वर्गीकरणासाठी पाठवण्यात येत होता. परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात सुरू होती. यावेळी सरपंच सागर नाईक यांनी पंचायत इमारतीजवळील नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानले. उद्‌द्घाटनप्रसंगी हरेन बोरकर म्हणाले की, पंचायतच्या मागणीनुसार कोमुनिदादने विविध वाडचांमध्ये स्मशानभूमी आणि मैदानांसाठीही जमीन उपलब्ध करून दिली असून, बोरी गावातील अनेक विकासकामांना कोमुनिदादमुळे गती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT