Ended life Pudhari Photo
गोवा

BITS Pilani student end of life note |मी आयुष्याला कंटाळलोय... बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याने नोटमध्ये काय लिहिलं?

BITS Pilani student end of life note |मी आयुष्याला कंटाळलोय... बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याने नोटमध्ये काय लिहिलं?

पुढारी वृत्तसेवा

BITS Pilani student note before die

दाबोळी : बिट्स पिलानी कॉलेजमध्ये पीएच.डी.चे शिक्षण घेणाऱ्या अर्जुन साबू या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'आत्महत्येस कोणालाच जबाबदार धरू नका, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने व्हेरी सॉरी. मी आयुष्याला कंटाळलो आहे', असा उल्लेख असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

बिट्स पिलानीमध्ये शिकणाऱ्या अर्जुन याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ११.३० वाजता वेर्णा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या १७ महिन्यांत हा सातव्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास वेर्णा पोलिस करीत आहेत.

अर्जुनने मागे सोडलेली एक पानी 'सुसाइड नोट' तपासल्यानंतर तो गेले काही काळ मानसिक तणावाखाली आणि अस्वस्थ होता का? याची चौकशी पोलिस करत आहेत. गुरुवारी शवचिकित्सा करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. केरळमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अर्जुन बिट्स पिलानीमध्ये पीएच.डी.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

पोलिसांनी सांगितले की, तो जानेवारी २०२५ पासून गोव्यात राहत होता. तो आदिवासी जीवनावर संशोधन करत होता. पोलिस माहितीनुसार, रहिवाशांनी अर्जुनला मंगळवारी (दि. १२) रात्री सुमारे १०.३० वाजता प्लॅटमध्ये जाताना अखेरचे पाहिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT