Banavali ZP By-Election
बाणावली जि.पं. पोटनिवडणुकीत 52.12 टक्के एवढेच मतदान झाले.  File Photo
गोवा

बाणावली जि.पं.साठी 52.12 टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : बाणावली जि.पं. पोटनिवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवली असून, अवघे 52.12 टक्के एवढेच मतदान नोंद झाले आहे. मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीमुळे या निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रस्तापितांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. राज्यातील विविध 10 पंचायतींमध्ये झालेल्या प्रत्येकी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीत एकूण 79.90 टक्के मतदान झाले आहे.

सर्वात जास्त मतदान कुडणे पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये

सर्वात जास्त मतदान कुडणे पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये 95.06 टक्के मतदान झाले. पंचायत सदस्य अपात्र ठरल्यामुळे काही ठिकाणी ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. सुकूरच्या प्रभाग 10 मध्ये एकूण 73.23 टक्के, कुडणेच्या प्रभाग 2 मध्ये 95.60, वळवईच्या प्रभाग 2 मध्ये 93.98, केरीच्या प्रभाग 3 मध्ये 74.86, कुंडईच्या प्रभाग 7 मध्ये 89.57, बोरी प्रभाग 11 मध्ये 83.23, राशेलच्या प्रभाग 5 मध्ये 77.97, सुरावली प्रभाग 2 मध्ये 70.56, असोळणा प्रभाग 1 मध्ये 60.87, शेल्डे प्रभाग 2 मध्ये 85.09 टक्के मतदान झाले. सर्व प्रभागांत 1799 पुरुष तर 1965 मतदारांनी मतदान केले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT