गोवा

Anant Chaturdashi 2023 : निर्गुणाला अनंतात विलीन करणे म्हणजेच अनंत चतुर्दशी

दिनेश चोरगे

पणजी :  श्री गणेशाचे निर्गुण रूप म्हणजे ध्वनी 'ओम' हा नाद आहे व तो चराचरात तरंग लहरीच्या रूपात भरलेला आहे, म्हणूनच गणपतीचे रूप 'ओंकार स्वरूप' आहे. त्याला आकार नाही, रूप नाही, सुरुवात नाही व शेवटही नाही. त्याचा थांग कुणाला लागू शकत नाही, म्हणूनच तो अथांग, अनंत आहे. सगुण रूप गणेशाचे घेऊन आलेला हा अनंत भाद्रपदातल्या चतुर्थीनंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी परत निर्गुण अनंतात विलीन होतो. या दिवशी श्री गणेशाला अनंत विष्णुरूप मानून त्याच्या पार्थिव मूर्तीचे विधिवत पूजन करून विसर्जन केले जाते. (Anant Chaturdashi 2023)

पुराणामध्ये अनंत चतुर्दशीचे व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. धनदौलत प्राप्तीसाठी दुसरी अनेक व्रते आहेत. पापमुक्तीसाठी तर अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. अनंत चतुर्दशीचे व्रत हे धन दौलत किंवा पापमुक्तीसाठी नसून मोक्ष आहेत. प्राप्तीसाठी आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे म्हणजे मोक्षप्राप्ती झाली, असे आपण मानतो. ज्यांनी ब्रह्म जाणिले त्याला मोक्ष प्राप्ती होते, असे आपले शास्त्र सांगते.

अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने लावलेल्या शोधाप्रमाणे अंतराळ 'अनंत' आहे व या अनंतात 'ओम ओम ओम…' असा सतत ध्वनी एकसारखा ऐकू येतो. या ओंकाराचे एक चरण २१ ओंकारांचे असून अशी अनेक चरणे अनंत काळापासून चालूच आहेत. विज्ञानानुसार कुठल्याही सदृश्य वस्तूचा शेवटचा कण जो आणखीन विभागला जाऊ शकत नाही. अशा कणाला 'अणू' म्हटले जाते हा अणू उघड्या डोळ्यांनी सोडाच कुठल्याच आधुनिक उपकरणांनी सुद्धा दिसूच शकत नाही. कारण तो सगुण स्वरूपात नसून निर्गुण तरंगाच्या रूपात अस्तित्वात असतो. याचाच अर्थ जे सगुण स्वरूप आहे, ते तरंगाच्या रूपात निर्गुण स्वरूपात आहे. निर्गुण स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याकरीता सगुणाचा आधार घ्यावाच लागतो म्हणून श्री गणेशाची सगुण रूपे वेगवेगळी आहेत. (Anant Chaturdashi 2023)

वेगवेगळ्या वस्तूंचे तरंग वेगवेगळे असत नसून ते एकाच स्वरूपाचे आहेत, असे विज्ञान सांगते. त्यामुळे या चराचरात भरलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची रूपे जरी वेगवेगळी दिसत असली तरी सर्वांचे अणुमात्र एकाच स्वरूपाचे आहेत. तो अणू म्हणजे ओमकार लहरीच्या रूपात 'अनंत' स्वरूपात आहे. त्यामुळे आपणही अनंताचाच भाग असून शेवटी अनंताचाच विलीन होणार आहोत. हेच ब्रह्मज्ञान आहे.

अनंत चतुर्दशी व्रत, निर्गुण ईश्वराचे स्वरूप

वैदिक सनातन हिंदू धर्मात मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जीवन प्रफुलित व उत्साहित करण्यासाठी सण उत्सव व्रत कैवल्याची मांडणी केली आहे. त्यामध्ये अधिक तर वैज्ञानिक दृष्टिकोन असून अनंत चतुर्दशी व्रत म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराचे सगुण रूप सुद्धा शेवटी निर्गुण अनंत असल्याची जाणीव करून देणारे आहे. म्हणूनच आपण अनंताचाच एक भाग आहोत. याचे ज्ञान प्राप्त झाले की त्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणतो. जो ब्रम्ह जाणतो त्याला मोक्ष प्राप्त होतो 'अनंत चतुर्दशी' हे व्रत मोक्षप्राप्तीचे व्रत होय त्यादिवशी अनंतरुपी विष्णूची पूजा केली जाते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पार्थिव मूर्तीचे विसर्जन करून निरोप दिला जातो. (Anant Chaturdashi 2023)

       हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT