Anant Chaturdashi 2023 : पुढच्या वर्षी लवकर या… राज्यभरात लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

Anant Chaturdashi 2023 : पुढच्या वर्षी लवकर या… राज्यभरात लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

पुढारी ऑनलाईन डेस्क : चैतन्यदायी वातावरणात मागील दहा दिवसांपासून साजर्‍या होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीने सांगता होत आहे. चित्ररथ, प्रबोधनात्मक देखावे, पारंपरिक वाद्ये, साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टस्सह बाप्पांची विसर्जन मिरवणूकीने राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. एकंदरी सर्वत्र जल्लोषाचं आणि उत्साहाच वातावरण आहे.

कोल्हापूरात विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरूवात झाली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुणे येथेही मानाच्या ५ गणपतीची वाजत गाजत मिरवणूक सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news