Amulya' boat : 'अमूल्य' गस्ती नौका सागरी सेवेत  File Photo
गोवा

Amulya' boat : 'अमूल्य' गस्ती नौका सागरी सेवेत

भारतीय तटरक्षक दलाच्या या जहाजाची गोवा शिपयार्डमध्ये बांधणी

पुढारी वृत्तसेवा

'Amulya' patrol boat inducted into maritime service.

दाबोळी/पणजी : पुढारी वृत्तसेवा भारतीय तटरक्षक दलाचे अमूल्य हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य -श्रेणीच्या जलद गस्ती जहाजांमधील तिसरे जहाज असून आज, दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी सेवेत दाखल झाले. गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते हे जहाज सेवेत दाखल करण्यात आले.

पद्मश्री लिविया लोबो सरदेसाई, महानिरीक्षक ज्योतिंद्र सिंह, टीएम उपमहासंचालक (मनुष्यबळ विकास) तटरक्षक दल मुख्यालय आणि चीफ ऑफ स्टाफ, तटरक्षक दल, पश्चिम सीबोर्ड, जीएसएल आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जहाज ३,००० किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या ५१ मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना आणि बांधकाम गोवा शिपयार्ड लिमिटेडने केले आहे. हे जहाज ओडिशातील पारादीप येथे तैनात असेल आणि कमांडर, तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्रमांक ७ द्वारे कमांडर, तटरक्षक दल क्षेत्र (ईशान्य) च्या प्रशासकीय आणि परिचालन नियंत्रणाखाली कार्यरत असेल.

अमिताभ प्रसाद म्हणाले की, अमूल्य हे जहाज भारतीय तटरक्षक दलाची परिचालन क्षमता अधिक अमूल्य बळकट करेल. अत्याधुनिक प्रणाली आणि ६० टक्के पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीने सुसज्ज असलेले, अमूल्य हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे एक झळाळते प्रतीक आहे. ते केवळ आपली तंत्रज्ञानातील प्रगतीच दर्शवत नाही, तर भारताचे सागरी सामर्थ्य आणि औद्योगिक पाया देखील मजबूत करते. सध्या सागरी वातावरण गतिशील आणि जटिल आहे. या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताफ्याचे आधुनिकीकरण, देखरेख क्षमता वाढवणे आणि परिचालन सज्जता मजबूत ठेवण्याचे काम सुरु ठेवले आहे.

अमिताभ प्रसाद म्हणाले की, या जहाजाची स्वदेशी बांधणी हे आपल्या जहाजबांधणी उद्योगाच्या वेगवान वाढीचे अभिमानास्पद प्रतीक आहे. स्वदेशीकरणामुळे राष्ट्रीय सामर्थ्य वाढते, आर्थिक वाढीस हातभार लागतो आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. राष्ट्र उभारणीत हे खरोखरच एक महत्वाचे व स्वागतार्ह पाऊल आहे.

जीएसएलचे संचालक (ऑपरेशन) रिअर अॅडमिरल नेल्सन डिसोझा म्हणाले की, सहा दशकांहून अधिक काळ, जीएसएल देशातील सर्वात विश्वासार्ह आणि बहुमुखी युद्धनौका निर्मात्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. "जीएसएलने आतापर्यंत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि मित्र राष्ट्रांना ४०० हून अधिक प्लॅटफॉर्म वितरित केले आहेत. यापैकी, ३५ प्लॅटफॉर्म तटरक्षक दलासाठी बांधण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT