पेडणे : पुढारी वृत्तसेवा
आश्वे मांद्रे मोरर्जी सीमेवर असलेल्या अजूले रिसॉर्ट मधील सांडपाणी दुर्गंधीमय पाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार वाढत असून हा प्रकार मागच्या सहा महिन्यांपासून सुरू आहे, तर तेथील संबंधित व्यवस्थापक म्हणतात हा प्रकार चार दिवसांपासूनच सुरू आहे.
मांद्रे पंचायत, प्रदूषण महामंडळ आणि आरोग्य खात्याने यावर लक्ष केंद्रित करून जे सांडपाणी उघड्यावर सोडतात आणि आरोग्याची समस्या निर्माण करतात. त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी कॉटेजेस हड्स आहेत; परंतु या रिसॉर्टमध्ये सिवरेज प्लांट नसल्यामुळे सांडपाणी अशा प्रकारे रात्री अपरात्री दिवसाढवळ्याही उघड्यावर सोडले जाते. शिवाय पारंपारिक ओहळ आहे.
त्या ओहोळामध्ये देखील सांडपाणी सोडण्याचा प्रकार या रिसॉर्ट मधून मागच्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या संदर्भात रिसॉर्टच्या संबंधित व्यवस्थापकाकडे संपर्क साधला असता केवळ चार दिवस पाणी बाहेर येण्याचा प्रकार घडल्याचा ते दावा करतात.
तर स्थानिकांचे म्हणणे आहे, ज्या जमिनीत जे कुळ मालक आहेत त्याचे म्हणणं आहे की, या जमिनीत मागील सहा महिन्यांपासून सांडपाणी सोडण्याचा सुरू प्रकार आहे आणि यावर सरकारने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. आता सरकारने कठोर कारवाई करून स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
रिसॉर्ट मालक, नागरिकांच्या बोलण्यात तफावत
रिसॉर्ट चालवणारे व्यवस्थापकाकडे संपर्क साधला असता त्यांचे म्हणणे आहे की, मागच्या चार दिवसांपासून पाणी कुठून तरी लीक होते. ते समजेले नाही प्लंबरला बोलावून ठीक करेल, असा ते दावा करतात.
मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की, मागच्या सहा महिन्यांपासून पाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार सुरू आहे. आरोग्य खाते प्रक्षण महामंडळाने गंभीर दखल घेत जी रिसॉर्ट सांडपाणी रस्त्याच्या बाजूला उघड्यावर सोडून आरोग्याची समस्या निर्माण करतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.