

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
वागातोर पेट्रोल पंपाजवळील शेत जमिनीत बेकायदा बांधकाम करून सुरू करण्यात आलेला 'गोया' हा नाईट क्लब उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील अंमलबजावणी समितीने सील केला.
संयुक्त हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेकायदा क्लबवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कुळाच्या जमिनीत बेकायदा क्लबची उभारणी करणे तसेच क्लबच्या काही महत्त्वाच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी मामलेदार अनंत मळीक, निरीक्षक निखिल पालेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.