पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बालरथचे ( बसेस ) चालक आणि मदतनीस यांना सेवेत कायम करावे, चालकांच्या वेतनामध्ये ११ हजारावरून २० हजार व मदतनीसांच्या वेतनात ५ हजारवरून १४ हजार एवढी वाढ करावी. सर्वांना सरकारी सेलेत घेऊन सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा. आदी मागण्यासाठी आज पणजी येथील आझाद मैदानावर काम बंद ठेवून धरणे आंदोलन केले. (Goa News)
स्वाती केरकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालूच राहणार असे स्वाती केरकर यांनी यावेळी सांगितले. ४२० बस चालक आणि ४२० मदतनीस असे एकूण ८४० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे कर्मचारी सरकारी कर्मचारी नाहीत, शाळा व्यवस्थापनने त्यांना कंत्राट वर घेतले आहे. त्यामुळे त्यांना सरकार सेवेत कायम करु शकत नाही. सरकार शाळांना बालरथ निधी देते. त्यातून चालक व मदतनीसांचा पगार दिला जातो. सरकार फक्त शक्य तेवढी वेतनवाढ देऊ शकते, अशी माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२०१६ साली या कर्मचाऱ्यानी विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने चालकांना १ हजार पगार वाढ केले होती मदतनिसांना ५५०० पगार वाढ केली होती. काल दि. १६ रोजी सरकारने चालकांना १ हजार व मदतनीसांना ५०० रुपये वाढ करण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र ही तटपुंजी वाढ मान्य नसल्याचे केरकर यांनी सांगितले.
हेही वाचा