Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेल लग्न पत्रिकेवरून भारतीय नातेवाईकांवर भडकला, म्हणाला... 
Latest

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेल लग्न पत्रिकेवरून सासूरवाडीच्‍या नातेवाईकांवर भडकला, म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) लग्नापूर्वी अनेक समस्यांना तोंड देत आहे. मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. अशा परिस्थितीत विनीचे भारतीय नातेवाईक मॅक्सवेलच्या अडचणी वाढवत असल्याची कुजबुज सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मॅक्सवेलच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही पत्रिका तमिळ भाषेत छापली होती.

लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आता लग्नस्थळी सुरक्षा वाढवावी लागेल असे म्हटले आहे. मॅक्सवेल २७ मार्चला मेलबर्नमध्ये विनी रमनसोबत लग्न करणार आहे. हा विवाह तामिळ रितीरिवाजांनुसार होऊ शकतो.

विनीच्या नातेवाईकांकडून लग्न पत्रिका व्हायरल…

मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) लग्नाची पत्रिका कस्तुरी शंकर यांनी ट्विटरवर शेअर केली होती. कार्ड शेअर करण्यासोबतच तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले होते. हीच बाब मॅक्सवेलला खटकली आहे. पत्रिका व्हायरल होण्यावरून तो चिंतेत आहे. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयु (cricket.com.au) शी केलेल्या संभाषणादरम्यान मॅक्सवेल म्हणाला की, लग्न पत्रिका व्हायरल करणे ही बाब मला पटलेली नाही. लग्न हा दोन कुटुंबांचा विषय आहे. आम्ही विनीच्या नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पाठवले होते, त्यांनी उत्साहित होऊन त्यांच्या काही मित्रांना लग्न पत्रिका दाखवली. त्यानंतर ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. भारतातील वर्तमानपत्रांपासून ट्विटरपर्यंत सर्वत्र ही पत्रिका पोहोचली.'

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मॅक्सवेल गैरहजर…

ग्लेन मॅक्सवेलचे (Glenn Maxwell) लग्न २७ मार्चला आहे. आयपीएल २०२२ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. तसेच तो ऑस्ट्रेलियन संघासोबत पाकिस्तान
दौ-यावरही जाणार नाहीय. त्याने याधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला नकार कळवलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मार्च आणि एप्रिल महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मॅक्सवेल या दौ-यादरम्यान तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा भाग नसेल. तर तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये खेळणार की नाही याबाबत अजून निश्चित झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT