Latest

गुगलच्‍या इंजिनिअरने बनवले समस्यांचे समाधान देणारे Gita-GPT अ‍ॅप

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: Google मधील एका इंजिनिअरने गीतेवर आधारित 'गीता-जीपीटी' (Gita-GPT) हे अ‍ॅप बनवले आहे. हे नव्याने डेव्हलप केलेले अ‍ॅप AI वर (आर्टिफीशअल इंटिलेजन्स) आधारित आहे. याच्या माध्यमातून जीवनातील समस्यांचे किंवा विविध प्रश्नांची उत्तरे मिळवता येणार आहेत. Gita-GPT हे अ‍ॅप बनवणाऱ्या इंजनिअरचे नाव साई विनीत असे आहे. तो गुगल इंडिया या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे.

Gita-GPT देणार जीवनातील समस्यांचे AI समाधान

गीता GTP हे सॉफ्टवेअर इंजिनिअर साई विनीत याने बनवले आहे. या अ‍ॅपला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा हे गीतेतील शिकवणीवर अधारित उत्तर देते. या अ‍ॅपपमध्ये गीतेशी सल्लामसलत करण्याची सुविधा देखील असल्याचे इंजिनिअर पुनित यांनी सांगितले.

जीपीटी ३ हा प्रोग्रॅम असलेल्या या अ‍ॅपला तुम्ही तुमच्या जीवनातील प्रश्न, समस्या विचारू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या समस्या किंवा प्रश्नांची उत्तरे आणि समाधान मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार, लोक त्यांचे प्रश्न, जीवनातील समस्या विचारण्यासाठी या GPT अ‍ॅपचा उपयोग करू शकतात. ज्याचा AI चॅट बोर्ड भगवत गीतेचा अभ्यास करून बनवण्यात आला आहे. जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

नव्याने डेव्हलप करण्यात आलेल्या 'गीता-जीपीटी' (Gita-GPT) याची माहिती स्वत: इंजनिअरने त्याच्या ट्विटरवरून दिली आहे. ट्विटरवरून त्याने या अ‍ॅपपसंदर्भात बोलताना सांगितले आहे की, २१ व्या शतकात तुमचे स्वागत आहे. देवाचे पवित्र गाणे आता तुमच्या तळहातावर आहे. यानंतर त्याने 'स्वतः भगवान श्रीकृष्णाला, भगवद्गीता बोलता आली तर?' असा प्रश्न उपस्थित करत, असे होऊ शकत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT