पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री गौहर खान आई झाल्यानंतर अनेक चाहत्यांकडून तिचे अभिनंदन झाले. (Gauhar Khan) पण, तिने आपल्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नव्हता. आता पती जैद दरबारसोबत मिळून तिने चाहत्यांना माहिती दिलीय की, त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. सोबतच चाहत्यांना विनंतीदेखील केलीय. (Gauhar Khan)
गौहर खानने आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गौहर खानने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, तिघे जण यामध्ये दिसत आहेत. गौहर – जैदने आपल्या मुलाचे नाव जेहान ठेवलं आहे.
गौहरने सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिलंय की, "आम्ही आमच्या मुलाचे नाव तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहोत. बेबी बर्थला एक महिना पूर्ण झाला आहे. तुम्हा सर्वांटे आशीर्वाद आमच्यासोबत असावेत, अशी आमची कामना आहे."
फोटो शेअर करत गौहरने फॅन्ससाठी लिहिलं की, आशा आहे की ते तिच्या खासगी जीवनाचा आदर करतील. गौहर आणि जैदने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे, पण, चेहरा दाखवलेला नाही. गौहर-जैद नेहमी आपल्या मुलांसोबत रील्स बनवताना दिसतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.