पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल (दि.२६) आपल्या ट्विटर अकाउंटवर कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासमवेतचा कृष्ण धवल (Black & White) फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रसेच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही एक भावूक पोस्ट सोनिया गांधी आणि राजीव गांधी (Gandhi Family) यांचा हातात घेतलेला फोटो शेअर करत लिहिली आहे. वाचा सविस्तर बातमी.
राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली सात सप्टेंबर पासून भारत जोडो यात्रा सुरु आहे. गेले काही दिवस ही यात्रा चर्चेत आहे. गेले तीन दिवस ही यात्रा दिवाळीनिमित्त स्थगित करण्यात आली होती. काल (दि.२६) कॉंग्रेस अध्यपदाचा पदभार मल्लिकार्जून यांनी स्वीकारला. तीन दिवसाच्या स्थगिती नतंर राहुल यांनी २७ ऑक्टोबर रोजी तेलंगनामधील नारायणपेठ जिल्ह्यातील मकतालमधून पुन्हा भारत यात्रा सुरु केली. तत्पूर्वी त्यांनी एक ट्विट करत म्हंटले आहे की, आई, आज्जीने एकदा मला सांगितले होते की, "तू अशी मुलगी आहेस की, जिला जन्म दिला नाही. ती किती बरोबर होती. मला अभिमान आहे तुझा मुलगा असण्याचा". राहूल गांधी यांनी शेअर केलेला फोटो हा सोनिया गांधी राजीव गांधी हे एका गल्लीतून जात आहेत आणि त्यांच्यासोबत लहान-लहान मुले आहेत असा आहे. हा फोटो १९८४ सालचा आहे. १९८४ मध्ये राजीव गांघी आणि सोनिया गांधी अमेठीमध्ये प्रचार करत होती.
प्रियांका गांधी यांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहित आपले आई बाबा म्हणजे सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा फोटो शेअर केला आहे. आई तुझा आम्हाला गर्व आहे, दुनिया काहीही म्हणो, काहीही विचार करो पण मला माहित आहे तू हे प्रेमासाठी केलं आहेस. काल (दि.२६) कॉंग्रस अध्यक्ष पदाचा पदभार सोनिया गांधींकडून मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे गेला आहे.
हेही वाचलंत का?