furstat 
Latest

Free Films : फ्रीमध्ये पाहा हे ५ चित्रपट! भविष्य, मर्डर मिस्ट्री आणि बरंच काही..

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुट्टीमध्ये घरी असताना फ्रीमध्ये हे पुढील पाच चित्रपट पाहता येतील. हे चित्रपट युट्यूबवर पाहता येतील. (Free Films) एक चित्रपट तर भविष्य सांगणाऱ्या मशीनवर आधारित आहे. खास म्हणजे, मर्डर मिस्ट्रीची कहाणी असलेला गुत्थीदेखील शेवटपर्य़ंत पाहता येईल, असा चित्रपट आहे. (Free Films)

संबंधित बातम्या –

फुरसत :

एका तरुणाने असे मशीन बनवले की, ज्यामधून भविष्य पाहता येईल. यावेळी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला मोठा धोका आहे. एका रेल्वेमध्ये तिला डाकू मारणार असतो. ती वाचणार की मरणार, की खरंच भविष्य बदला येईल?

चटणी :

एका महिलेला संशय आहे की, तिच्या पतीचे शेजारणीशी अफेअर सुरु आहे. मग, एका पार्टीचे आयोजन केलं जातं. यामध्ये स्पेशल डिश असते – चटणी. ही चटणी जो कुणी खाईल, तो मरेल. पण ही चटणी नेमकी कुणी बनवली आणि कोणासाठी?

अनुकुल :

आपण ऐकलंय की माणसाचे काम भविष्यात रोबोट केरल. असाच विषय अनुकूलमध्ये आहे. कोलकाचामधील ही कहाणी दाखवण्यात आलीय. खरचं रोबोट माणसाचा नोकर आहे की मालक?

क्रिती :

एक रुग्ण मेंदूच्या डॉक्टरांना भेटायला जातो. तो आपल्या नव्या गर्लफ्रेंडला घेऊन भेटण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. पण ही गर्लफ्रेंड कुणाला दिसत नाही. फक्त ती त्या रुग्णाशी बोलत असते. डॉक्टर नकली आहे की सर्व काही धोका आहे?

गुत्थी :

एका इमारतीती कचरा उचलणारा व्यक्ती एका लेखकाला मर्डर मिस्ट्री ऐकवतो. कथा ऐकल्यानंतर लेखक शेवटी उत्तर देऊ शकेल का? हा मर्डर फक्त कहाणीमध्ये झाला की खराखुरा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT