Latest

पोटचा मुलगाच बनला वैरी ! आईच्या बनावट सह्या करून केली फसवणूक

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आयुष्याच्या संध्याकाळी आईला आर्थिक मदत करण्याचे सोडून तिची बनावट सही करून सदनिका परस्पर विक्री करत फसवणूक केल्याप्रकरणी मुलावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पिडीत आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही 68 वर्षांची असून ती आपली मुलगी, जावयाबरोबर तसेच लहान मुलाबरोबर मोहम्मदवाडी येथे राहते. तक्रारदार यांचे पती सरकारी नोकरदार होते. त्यांचे 2006 मध्ये निधन झाले.
यावेळी तक्रारदार महिला ही आपल्या मोठा मुलगा, सून आणि तिच्या मुलाबरोबर राहत होती. तर त्यांचा एक मुलगा हा के. के. मार्केट परिसरात राहण्यास होता. त्यांचा आंबेगाव येथे एक फ्लॅट आहे. त्या मोठा मुलासोबत राहण्यास होत्या. त्यांची येणारी पेन्शन मोठा मुलगा घरात खर्च करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने मुलाने त्यांना 2016 घराबाहेर काढले. याच दरम्यान त्या मुली आणि जावयाबरोबर राहत होत्या. त्यानंतर त्यांना दुर्धर आजाराचे निदान झाले. उपचारासाठी त्यांना पैशाची आवश्यकता पडली तेव्हा मुलीने आणि जावयाने त्यांच्याकडून होईल तेवढे प्रयत्न  केले.
मुले असूनही मुलगी त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. 2018 मध्ये त्यांनी रितसर मुलीच्या नावावर त्यांच्या हिश्याचा फ्लॅट बक्षीसपत्राने नावावर करून दिली. याबाबत मोठ्या मुलाला समजल्यानंतर त्याने त्या फ्लॅटवर भाडेकरू ठेवले. तसेच तो फ्लॅट विक्रीच्या हालचाली सुरू केल्या. याच दरम्यान मुलाने तो फ्लॅट बनावट सह्या करून मंगळवार पेठेतील एकाला विकल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. त्यानंतर आता मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT