Fractured Freedom 
Latest

Fractured Freedom : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेला पुरस्कार रद्द;राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात 

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी (Fractured Freedom) लिखीत ''फ्रॅक्चर्ड फ्रीडम' आत्मकथनाच्या अनघा लेले यांनी केलेल्या अनुवादाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. यामुळे राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या पुस्तकाला २०२१चा  अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार मिळाला होता.

प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार हा कोबाड गांधी (Fractured Freedom) यांनी लिहलेल्या  'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला देण्यात आला होता. हे पुस्तक अनघा लेले यांनी अनुवादीत केले आहे.  त्यानंतर तो पुरस्कार रद्द करण्यात आला तसेच जी निवड  समिती होती. तीही रद्द करण्यात आली आहे. नक्षलवादाचं उदात्तीकरण राज्यात होऊ शकत नाही, असा आक्षेप घेत पुरस्कार तज्ज्ञ समितीची चौकशी करण्याचा आदेश केसरकर यांनी दिला आहे.

Fractured Freedom : कोण आहेत कोबाद गांधी ?  

कोबाद गांधी हे मुंबईचे आहेत. ७० च्या दशकातील समाजातील वंचित आणि शोषित लोकांसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते भाकप (माओवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य बनले. २००९ मध्ये कोबाड गांधी यांना नक्षली कारवायात सक्रीय असल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. तुरुंगातील दिवसांवर त्यांनी एक पुस्तक लिहले. ते म्हणजे, 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन'.

हेही वाचा :       

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT