Latest

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कार अपघातात सुरतमधील ४ चुलत भावांचा मृत्यू

अविनाश सुतार

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जोराची धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) पहाटे तीनच्या सुमारास करमाड- शेकटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) घडली. संजय रजणभाई गौड (वय ४३, रा.कृष्णा), राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१, सर्व रा. लेफ सिटी, करडवा, सुरत) अशी मृत चुलत भावांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गौड कुटुंबीयांचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे. मृत सर्वजण काकांच्या अंत्यविधीसाठी कारने तेलंगना येथे गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडे आज पहाटे सुरतकडे निघाले होते. दरम्यान, करमाड – शेकटा येथील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)  वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर कारमध्ये मागे बसलेला मुलगा सुदैवाने बचावला.

या अपघातानंतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघाताची करमाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT