Latest

WTC Final : ‘डब्ल्यूटीसी’च्या पार्श्वभूमीवर वर्कलोड मॅनेजमेंटवर फोकस

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयपीएल स्पर्धेत थकल्या भागलेल्या गोलंदाजांच्या वर्कलोडचा मुद्दा आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दि. 7 जूनपासून ओव्हलवर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. या सामन्याची तयारी करत असताना विशेषत: जलद गोलंदाजांना सराव सत्रादरम्यान पुरेशी विश्रांती मिळेल, याची खातरजमा करून घेतली जाईल, असे संकेत आहेत. (WTC Final)

गोलंदाजीच्या आघाडीवर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट, उमेश यादव पहिल्या पथकातून इंग्लंडला रवाना झाले. आघाडीचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी मात्र आयपीएल फायनल एक दिवस लांबणीवर टाकली गेल्याने पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे रवाना होऊ शकला नाही. (WTC Final)

मध्यफळीतील फलंदाज विराट कोहली देखील पहिल्या पथकातून रवाना झाला. कोहली सोमवारी चेतेश्वर पुजारासह पथकात दाखल झाला. पुजारा यापूर्वी ससेक्सतर्फे कौंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत होता. भारतीय क्रिकेट संघ फायनलपूर्वी ससेक्समधील एका स्थानि क्लबतर्फे सराव करणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक टी. दिलीप यांनी आता क्लोज-इन कॅचिंगवर अधिक भर दिला जाणार असल्याचे म्हटले आहे.

फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आता कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक बदलाशी जुळवून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे नमूद केले. भारतीय खेळाडू सध्या खूपच खेळत आले आहेत. कोणत्याही क्रिकेट प्रकारात खेळत असताना त्याच्याशी जुळवून घेण्यावर भर द्यावा लागतो. त्यामुळे, पुढील काही सराव सत्रे विशेष महत्त्वाची ठरणार आहेत, असे ते म्हणाले.

जोश हेझलवूड फायनलसाठी पूर्ण तंदुरुस्त

आगामी फायनलच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ इंग्लंडमधील फोम्बी येथे सराव करत असून आता हेझलवूडने देखील सातत्याने सराव सत्रात भाग घेत फायनलसाठी आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचा दाखला दिला आहे.

मागील 6 महिन्यांच्या कालावधीत हेझलवूडला सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागला असून याच कारणामुळे आयपीएलमध्येही त्याला निम्यातून माघार घ्यावी लागली. पण आता सराव सत्रात उत्तम सूर सापडला असल्याने त्याने पूर्ण वेगाने गोलंदाजीवर भर दिला आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT