जळगाव : जळगाव मध्ये भीषण अपघात होऊन पाचजण जागीच ठार झाले आहे. जळगावमधील मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ दुधाच्या टॅंकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच-जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बंद पडलेल्या टॅंकरमधून दुस-या टॅंकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टॅंकरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळील हायवेवर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या 5 मजूरांपैकी 4 जण हे धुळे तर 1 जण जळगाव येथील आहे. मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहे.