First Organ Donation 
Latest

First Organ Donation :  जगातील पहिलं अवयव दान झालं होत जुळ्या भावांच्यात 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्ट महिन्यातील १३ ऑगस्ट हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय अवयव दिन म्हणून साजरा केला जातो. अवयव दानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी व प्रोत्साहित करण्यासाठी  हा दिन साजरा केला जातो. अवयवदानात मूत्रपिंड, स्वादुपिंड, फुफ्फुस, यकृत, आतडे, हात, चेहरा, ऊती, अस्थिमज्जा आणि स्टेम पेशी दान करु शकतात. आंतरराष्ट्रीय अवयव दिनानिमित्त जाणून घेवूया  जगातील पहिलं अवयव दान (First Organ Donation) कोणी केलं होतं.

First Organ Donation :  जगातील पहिलं अवयव दान

शरीरासंदर्भात विचार केल्यास नेत्रदान, रक्तदान, अवयव दान, देहदान आदी स्वरुपात करता येते; पण आपण करत असलेले दान ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. आज 'जागतिक अवयव दान दिवस' आणि अवयव दान हे कोणाच्यातरी  जगण्याच कारणं बनत असते.

First Organ Donation

तुम्हाला माहित आहे का? जगातील पहिलं अवयव दान दोन जुळ्या भावांच्यात झालं होतं. आज अनेक शोधांमुळे मानवी आयुष्य सुखकर झालं आहे. आज एखाद्या व्यक्तीला अवयव हवं असेल तर ते आता देवू शकतो. जगातील पहिलं अवयव दान अमेरिकेत झालं होत. १९५४ साली रोनाल्ड आणि रिचर्ड हेरिक या जुळ्या भावांमध्ये झालं होत. यामध्ये किडनी  प्रत्यारोपण झालं होतं. हे अवयव दान डॉक्टर जोसेफ मरे यांनी केलं होतं. याबद्दल डॉक्टर जोसेफ मरे यांना  १९९० मध्ये शरीर विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

आजची परिस्थिती पाहाता अवयवदानाबद्दल बरेच गैरसमज पाहायला मिळतात; पण अवयवदानामुळे  लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल. थोडक्यात अवयव दान हे जीवनदान आहे. तुम्हाला जर अवयव दान करायचं असेल तर अवयव दान संबधित माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता किंवा विभागीय रोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Centre-ZTCC) कडे माहिती घेऊ शकता.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT