Latest

Ashneer Grover : ‘भारत पे’ कडून अशनीर ग्रोव्हर यांची सर्व पदांवरून उचलबांगडी !

backup backup

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : फिनटेक प्लॅटफॉर्म 'भारत पे' सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांची कंपनीने सर्व पदावरून उचलबांगडी केली आहे. फिनटेक फर्मकडून अशनीर ग्रोव्हर यांच्यासह त्यांच्या कुटुबीयांकडून कंपनी फंडचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.

कंपनीने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांच्यासह कुटुबीयांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग खुला आहे. तथापि, त्यांच्या राजीनाम्यावर कोणतेही भाष्य केलेलं नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कंपनी बोर्ड अशनीर कुटुबांकडून झालेली बदनामी सहन करणार नाही जी कष्ट करणारा कर्मचारी वर्ग आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने नावारुपाला आली आहे. त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे ते कंपनीचे कर्मचार संस्थापक किंवा कंपनीचे संचालक नसतील.

कंपनीने आपल्या निवदेनात पुढे म्हटले आहे की, बोर्ड भारत पेच्या विकासाठी लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जातील. यामध्ये लेखा समिती, अंतर्गत लेखा परीक्षक, त्याचबरोबर अंतर्गत व्यवस्थापनासाठी महत्त्वांच्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल.

अशनीर ग्रोव्हर यांचे राजीनाम्यानंतर पत्र

दरम्यान, अशनीर ग्रोव्हर यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक पदाचा काल राजीनामा दिला. सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) ने बोर्डाची चौकशी थांबवण्यासाठी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर एका दिवसानंतर अश्नीर ग्रोव्हर 'भारतपे'च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन पायउतार झाले.

बोर्डाला लिहिलेल्या पत्रात, ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी म्हटले आहे की त्यांना काही लोकांकडून विनाकारण लक्ष्य केले जात आहे आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली.

ते म्हणाले की, मी व्यथित मनाने हे लिहित आहे कारण आज मला एका कंपनीचा निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे ज्याचा मी संस्थापक आहे. मी अभिमानाने सांगतो की आज ही कंपनी फिनटेक जगतात आघाडीवर आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून, दुर्दैवाने, मला आणि माझ्या कुटुंबाला काही लोकांनी वादात अडकवले. काही लोकांनी केवळ माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली नाही तर ते कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावत आहेत.

मी माझे गुंतवणूकदार आणि व्यवस्थापन यांच्या विरुद्धच्या दीर्घ, एकाकी लढाईत वेळ वाया घालवू शकत नाही. दुर्दैवाने, या लढाईत व्यवस्थापनाने 'भारतपे'कडे दुर्लक्ष केले आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नीची सुद्धा हकालपट्टी

'भारतपे'चे सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन यांना हेड ऑफ कंट्रोल पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. कंपनीच्या निधीचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी आरोप फेटाळत कंपनीचे चेअरमन रजनीश कुमार तसेच सहसंस्थापक भाविक कोलाडिया व सीईओ सुहेल समीर यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप करत पलटवार केला होता.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT