पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ पाडणारी अमृता खानविलकर ही फिल्म फेअरच्या
( Filmfare ) पेजवर झळकणारी पहिली मराठमोळी अभिनेत्री ठरली आहे.
नुकतचं अभिनेता प्रसाद ओक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अमृताचे फोटो शेअर करत लिहले आहे की, अभिमान, प्रेम, अभिनंदन FILMFARE च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली अभिनेत्री तू ठरली आहेस. अमृता याचा प्रचंड अभिमान वाटतोय. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझी चिकाटी गेली दोन अडीच वर्ष बघतोय. त्यासाठी तुला खूप प्रेम. हा बहुमान तुला मिळाला याबद्दल तुझं खूप, खूप, खूप अभिनंदन.
Filmfare : फिल्मफेयरच्या पेजवर झळकणारी पहिली मराठमोळी अभिनेत्री
आपली #चंद्रा ठरली आहे FILMFARE च्या DIGITAL COVER PAGE वरझळकणारी "पहिली मराठी अभिनेत्री…प्रसाद ओक यांच्या या पोस्टवर अमृतासह अनेक कलाकारांनी कॉमेंटस केल्या आहेत. अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अमृतानेही आपला फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहलं आहे की, ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी गुढीपाडव्याची मोठी भेट आहे" @filmfare" कव्हर गर्ल. मी अक्षरशः याचं स्वप्न पाहिलं होतं. यासाठी कठोर परिश्रम केले आणि अगदी धीराने या सोनेरी क्षणाची वाट पाहिली. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
अमृता खानविलकरचा लवकरचं चंद्रमुखी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. मराठी कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी (Chandramukhi) या बहुचर्चित कादंबरीवर आहे. या चित्रपटात अमृता ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगनेची भूमिका केली आहे. तर आदीनाथ कोठारे (Adinath Kothare) हा दोैलत देशमाने या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक, पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर तर चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.