Latest

सिंधुदुर्ग : तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरण ; बाेट मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल

मोनिका क्षीरसागर

मालवण ; पुढारी वृत्तसेवा
तारकर्लीच्या बोट दुर्घटनेत दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बोट मालकांवर कारवाई करत सात जणांविरूद्घ गुन्ह दाखल करण्यात आला आहे. गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली) बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह अन्य पाचजण अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय ३६, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन बोटीतील सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन ही दुर्घटना घडली होती. यात अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. अन्य पर्यटक जखमी झाले होते. याप्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय २३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय ३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (वय ३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय ५४, रा. देवबाग) यांच्यावर भादवि कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे करीत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT