पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. निर्धारित मिनिटांमध्ये २-२ अशी बरोबरी राहिल्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँडचा ४-३ असा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. रोमहर्षक सामन्यात त्यांनी नेदरलँडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. अर्जेंटिना संघ आता 13 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीत क्रोएशियाशी खेळणार आहे. नेहुएल मोरीनाने 35 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. लिओनेल मेस्सीच्या शानदार पासवर त्याने गोल केला. मेस्सीने 73 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. यानंतर अर्जेंटिनाचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या बाउट बेघोर्स्टने सामन्याचे चित्र फिरवले. 83 व्या मिनिटांला बाउट बेघोर्स्टने गोल करत नेदरलँड्सला पुन्हा रुळावर आणले. 90 मिनिटांपर्यंत अर्जेंटिनाच्या बाजूने स्कोअर 2-1 होता. बाऊट बेघोर्स्टने दुसरा गोल करून सामन्यात बरोबरी साधली. सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. अतिरिक्त वेळेनंतरही सामना 2-2 असा बरोबरीत राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकला.
हेही वाचा :