महिला क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात; मालिकेत आघाडी | पुढारी

महिला क्रिकेट : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात; मालिकेत आघाडी

मुंबई; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात तब्बल 9 विकेटस्नी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने ठेवलेले 172 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एका बॅटरच्या मोबदल्यात 18.1 षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर बेन मुनीने नाबाद 89 धावांची खेळी केली. तर तिला मॅग्राथने 40 धावांची नाबाद खेळी करत चांगली साथ दिली. सलामीवीर एलिसा हेलेने 37 धावांची उपयुक्त खेळी केली.

भारताने ठेवलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. बेथ मुनीने भारतीय गोलंदजांची चांगलीच धुलाई केली. तिला साथ देणार्‍या ताहलिया मॅग्राथला देखील राधा यादवनेच झेल सोडून जीवदान दिले. या दोघींनी मिळून दुसर्‍या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत भारताचे आव्हान 18.1 षटकांतच पार केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली असताना दीप्ती शर्माने स्लॉग ओव्हरमध्ये धुमाकूळ घालत संघाला 20 षटकांत 5 बाद 172 धावांपर्यंत पोहोचवले. दीप्ती शर्माने 15 चेंडूंत नाबाद 36 धावा केल्या. दीप्तीबरोबरच रिचा घोषने 36 धावांची तर देविका वैद्यने 24 चेंडूंत नाबाद 25 धावांची खेळी केली. शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 21 तर स्मृती मानधनाने 28 धावांचे योगदान दिले.

Back to top button