Latest

FIFA WC Tunisia Vs France : गतविजेत्या फ्रान्सला ट्युनिशियाचा हादरा; १ – ० ने केले पराभूत

अमृता चौगुले

दोहा; वृत्तसंस्था : वाहिबी कहझारी याने रोमांचकारी सामन्यात 58 व्या मिनिटाला झळकावलेल्या शानदार गोलच्या जोरावर ट्युनिशियाने 'डी' ग्रुपमधील लढतीत बुधवारी गतविजेत्या फ्रान्सला हादरवले. सर्वाधिक काळ चेंडूवर ताबा असूनही फ्रान्सला शेवटपर्यंत ट्युनिशियाशी बरोबरीदेखील साधता आली नाही. (FIFA WC Tunisia Vs France)

फ्रान्सवर जणू दैवही रुसले होते. सामना संपत आलेला असताना त्यांचा आघाडीपटू अँटोनी ग्रीझमनने लगावलेला फटका थेट जाळ्यात जाऊन विसावला. तथापि, पंचांनी पुनःनिरीक्षणचा (रिव्ह्यू) निर्णय घेतला. त्यावेळी ग्रीझमन ऑफ साईड असल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि फ्रान्सच्या गोटात उदासवाणी शांतता पसरली. (FIFA WC Tunisia Vs France)

या लढतीत ट्युनिशियाच्या बचावफळीने जिगरबाज खेळाचे अफलातून प्रदर्शन घडविले. वास्तविक चेंडूवर फ्रान्सचेच वर्चस्व दिसून आले. त्यांनी खरोखरच चांगल्या चाली रचल्या. मात्र, देसचँप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या या चमूला नेहमीसारखी आक्रमकता दाखवता आली नाही. त्यांच्या बचावफळीतील एकमेव चुकीचा फायदा ट्युनिशियाला मिळाला व तिथेच फ्रान्सच्या करुणाजनक पराभवाची बीजे रोवली गेली. आपण ट्युनिशियाकडून पराभूत झालो आहोत हेच फ्रेंच चाहत्यांच्या पचनी पडले नाही.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT