Latest

FIFA WC 2022 : विश्वचषकाच्या बाद फेरीतील पेनल्टी शुटआऊट आणि क्रोएशियाचे काय आहे समीकरण

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्नचषक स्पर्धेच्या अतिरिक्त वेळेत १-१ अशा बरोबरीनंतर क्रोएशियने ब्राझीलचा पेनल्टी शुटआऊटवर ४-२ ने पराभव केला. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवण्याची कामगिरी या संघाने कायम ठेवली आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचवेळाचा विश्वविजेता असलेल्या ब्राझीलचा पराभव करून क्रोएशियाने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. क्रोएशियाचा संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारली होती.

क्रोएशिया आणि पेनल्टी शुटआऊट काय आहे समीकरण!

क्रोएशियासाठी पुन्हा एकदा त्यांचा गोलकीपर लिव्हकोविक हिरो ठरला. पेनल्टी शूटआऊटदरम्यान लिव्हकोविचची कामगिरी महत्त्‍वाची ठरली. याआधी क्रोएशियाने राऊंड ऑफ १६ फेरीच्या सामन्यात जपानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ने पराभव केला होता. त्या सामन्यातही क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हाकोविकने उत्तम सेव्ह केले. आतापर्यंतच्या सर्व फिफा विश्वचषकातील क्रोएशियाच्या बाद फेरीतील चार सामने पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेले आहेत आणि चारही सामने क्रोएशियाने जिंकले आहेत.

२०१८ विश्वचषकातील पेनल्टी शुटआऊटमधील कामगिरी

२०१८ साली झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियन संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच्या आधी राऊंड ऑफ १६ फेरीच्या सामन्यात त्यांनी डेन्मार्कचा, उपांत्यपूर्व फेरीत रशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात जपानपाठोपाठ त्यांनी ब्राझीलचाही पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. क्रोएशिया आता उपांत्य फेरीत अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील विजेत्याशी भिडणार आहे.

क्रोएशियाचा विक्रम

जेव्हा-जेव्हा क्रोएशियाचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. तेव्हा संघ अंतिम चारमध्येही पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. याआधी १९९८ आणि २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेत मध्येही क्रोएशियन संघाने ग्रुप स्टेजमध्ये वरचढ होऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत त्यांना फ्रान्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, ब्राझीलबद्दल बोलायचे झाले तर हा संघ गेल्या चार विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT