पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषकात आज (दि. २१ नोव्हेंबर) तीन सामने खेळवले जाणार आहेत. 'ब' गटातील इंग्लंड आणि इराण याच्यात खेळवला जाणार आहे. (FIFA WC 2022) या सामन्याची सुरूवात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. दुसरीकडे गट 'अ' मधील नेदरलँडचा सामना सेनेगलशी होणार आहे. हा सामना रात्री ९.३० वाजता सुरू होणार आहे. दिवसातील तिसरा आणि शेवटचा सामना 'ब' गटातील अमेरिका आणि वेल्स यांच्यात रात्री १२.३० वाजता होणार आहे.
सोमवारी इराणचा सामना बलाढ्य इंग्लंड विरूध्द होणार आहे. यावेळी इंग्लंडचा संघ इराणला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. या सामन्यात विजयाचा दावेदार मानला जात आहे. (FIFA WC 2022) तसेच इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांच्या संघाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे, परंतु इराणकडे त्यांचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोझ आहेत. त्यांनी सर अॅलेक्स फर्ग्युसन यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कामगिरी केली आहे.
इंग्लंडचा स्टार खेळाडू व कर्णधार हॅरी केनच्या कामगिरीवर संघाचे भवितव्य अवलंबून आहे. त्याने पात्रता फेरीत 12 गोल केले आहेत.. दुसरीकडे, इराणला पात्रता फेरीत 10 गोल करणाऱ्या सरदार अझमोनच्या चांगल्या कामगिरीवर अवलंबून असेल. क्विरोझचा हा सलग चौथा विश्वचषक आहे. ते 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पोर्तुगालचे प्रशिक्षक होते. याशिवाय 2014 आणि 2018 मध्ये त्यांनी इराणच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.
अमेरिका आणि वेल्स हे संघ विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी रात्री ब गटातील सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत.वेल्सने विश्वचषक स्पर्धेसाठी गाठण्यासाठी बराच पल्ला गाठला आहे. आणि प्रशिक्षक रॉब पेजची बाजू 1958 नंतर प्रथमच स्पर्धेमध्ये दिसणार आहेत.
अमेरिकेचा संघ २०१८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. अमेरिकेचे प्रशिक्षक ग्रेग बेरहल्टर यांनी सोमवारी या स्पर्धेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली. संघाचा नवा कर्णधाराचे नाव टायलर ॲडम्स असे आहे. तो अमेरिकेचा सर्वात तरुण कर्णधारही आहे. त्याचे वय २३ वर्ष इतके आहे. अमेरिकेला आपला स्टार फॉरवर्ड ख्रिश्चन पुलिसिककडून दमदार कामगिरीची आशा आहे. वेल्स संघाची जबाबदारी संघाचा स्टार फॉरवर्ड गॅरेथ बेलच्या खांद्यावर आहे. वेल्स संघाला गेल्या तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हेही वाचा;