Latest

FIFA WC 2022 : पोर्तुगालला नमवत द. कोरिया राऊंड ऑफ १६ मध्ये दाखल

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील पोर्तुगालचा सामना शुक्रवारी (दि. २ डिसेंबर) दक्षिण कोरिया यांच्यात खेळवण्यात आला. या अटीतटीच्या सामन्यात द, कोरियाने पोर्तुगालचा २-१ अशा गोल फरकाने पराभव करत फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश केला आहे.

ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावूनदेखील पोर्तुगाल संघ दोन सामन्यातील विजयी सहा गुणांसह ग्रुप एचच्या अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर कोरियाने तीन सामन्यातील एक विजय आणि एका सामना बरोबरीत सोडवून ४ गुणांसह ग्रुपमधील दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. राऊंड ऑफ १६ फेरीत पोहचण्यासाठी कोरिया संघाला पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे महत्वाचे होते. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ आधीच राऊंड ऑफ १६ फेरीत पोहोचला आहे.

पोर्तुगाल आणि कोरिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात दोन्ही संघानी आक्रमक खेळीचा पवित्रा स्विकारत सुरूवातीपासूनच विरोधी संघाच्या गोलपोस्टवर आक्रमणांचा सपाटा लावला होता. यावेळी सामन्याच्या पाचव्या मिनिटाला पोर्तुगालने गोल करत सामन्यात आघाडी घेतली. पोर्तुगालकडून रिकार्डो होर्टा याने गोल करत सामन्यात आपल्या संघाचे खाते उघडण्यास मदत केली. पोर्तुगालचा संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार असे सर्वांना वाटत होते. परंतु कडव्या द. कोरियाने त्यांना चांगलीच झुंज दिली.

पोर्तुगालने गोल करण्यासाठी कोरियाच्या गोलपोस्टवर अनेक आक्रमणे केली. परंतु कोरियाच्या बचावपटूंनी केलेल्या भक्कम बचावामुळे पोर्तुगालाल पुढे एक ही गोल करण्यात यश आले नाही. त्यांनी पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो रोखून धरत त्याला गोल करण्याची एक ही संधी दिली नाही. गोल करण्यासाठी रोनाल्डोने अनेक चढाया केल्या परंतु, त्याला गोल करण्यात अपयश आले.

सामन्याच्या २७ व्या मिनिटाला कोरियाने पोर्तुगालच्या गोलपोस्टवर आक्रमण करत संघासाठी गोल नोंदवला. हा गोल द. कोरियाच्या किम एंग ग्वॉनने त्याने गेल्या विश्चचषक स्पर्धेत जर्मनी विरूध्दच्या सामन्यातही गोल केला होता. स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ मध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे होते. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये (९०+१) कोरियाने दुसरा गोल करत पोर्तगाल विरुद्ध विजय मिळवला. या विजयासह द. कोरियाने स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश निश्चित केला. कोरियासाठी सामन्यातील दुसरा गोल ह्वांग ही चॅन याने केला तसेच २०१० नंतर द. कोरियाचा संघ राऊंड ऑफ १६मध्ये पोहचला आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT